June 28, 2018 Admin

मुलींच्या आरोग्यविषयक शिक्षणाकडे लक्ष घ्या : ऍड गौरी चांद्रायण
क्लॅरेन सॅनिटरी पॅड्स तर्फे सरस्वती शिशु मंदिरात आरोग्य अभियान

"महिला सक्षमीकरणासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न होत असतांना, विद्यार्थी अवस्थेतूनच मुलींच्या आरोग्यविषयक शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शरीर स्वस्थाबाबत योग्य वेळी योग्य प्रशिक्षण मिळाले तर भविष्यात त्याचा निश्चितच उपयोग होतो" असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ग्राहकविषयक सल्लागार अँड गौरीताई चांद्रयान यांनी आज केले . प्रसादनगर येथील सरस्वती शिशु विहार येथे क्लॅरेन सॅनिटरी पॅड्स च्या युक्त विद्यमाने विद्यार्थिनी आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अँड चांद्रयान बोलत होत्या मुख्याध्यापिका सौ मृदुल भुते, सौ वैशाली बपोर्डीकर, सौ अपर्णा फलटणकर यावेळी मंचावर उपस्थित होत्या. सौ अपर्णा फलटणकर यांनी सर्वप्रथम या अभियानाची संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. दैनंदिन जीवनात मुलींना येणाऱ्या आरोग्य विषयक अडचणी आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी यावर सर्वांकष चर्चा झाली . अँड सौ चांद्रयान यांनी या अभियानाच्या माध्यमातून गरजू आणि कष्टकरी समाजातील मुलींना कसा लाभ देता येईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले . सॅनिटरी पॅड्स वापराबाबतचे समझ गैरसमज आणि काळाची गरज याबाबत विद्यार्थिनींनी मनमोकळी चर्चा केली. सियान ऍग्रो इंडस्ट्रीज च्या वतीने यावेळी सरस्वती शिशु विहारला क्लॅरेन सॅनिटरी पॅड्सचा बॉक्स भेट देण्यात आला. मुख्याध्यापिका सौ मृदुल भुते यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मानस समूहाचे विपणन महाव्यवस्थापक मनीष उमाळे, सौरभ शर्मा, संजय अलोणे आदींसह सरस्वती शिशु मंदिराचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मा संपादक,
कृपया सोबतचे वृत्त आपल्या दैनिकात प्रकाशित करावे हि विनंती.
आपला
नितीन कुलकर्णी
जनसंपर्क अधिकारी( सियान)